पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची प्रशंसा करताना म्हटले की दहा वर्षे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपले कौशल्य, संयम आणि बुध्दीचा वापर केला. राज्यसभेत कुठल्याही परिस्थितीत शांत राहावे लागते.
हमीद अन्सारी यांच्यासाठी संसदेत आयोजित निरेाप समारंभात पंतप्रधान म्हणाले की अन्सारी प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वादविवादांपासून दूर राहिले.
पंतप्रधान म्हणाले की अन्सारी यांचे कुटुंब अनेक पिढयांपासून सार्वजनिक जीवनात आहे. त्यांनी ब्रिगेडिअर उस्मान यांचा विशेष उल्लेख केला, जे 1948 मध्ये देशाचे संरक्षण करताना शहीद झाले.
पंतप्रधानांनी अन्सारी यांना सूचना केली की राज्यसभा चालवण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांनी लिहून काढावेत जेणेकरुन वरच्या सभागृहाचे कामकाज प्रभावीपण कसे केले जाते ते सर्वांना कळेल.”
N.Sapre/S.Kane/Anagha
Joined the farewell programme for Vice President Shri Hamid Ansari. pic.twitter.com/q7ruIVTYDn
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2017