Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील प्रमुख अंश


ह्या सभागृहात मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळावा अशी विनंती मी सर्व पक्षांना करतो.

संसदेतील काही सदस्यांनी व्यक्त केलेल्या नकारात्मक भावना आज अम्पूर्ण देशाने पहिल्या.काही लोकांचा विकासाला किती विरोध आहे, हे ही भारताने पहिले.

जर तुम्ही चर्चेसाठी तयारच नव्हतात, मग तुम्ही हा अविश्वास प्रस्ताव मांडलाच का? तुम्ही या प्रस्तावावरील चर्चा टाळण्याचा प्रयत्न का करत होते?   

तुम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे- मोदी हटाओ !

आज आपण विरोधी सदस्यांमध्ये काही पहिले असेल तर ते म्हणजे केवळ अहंकार !

मला या सदस्यांना आज सांगायचे आहे, की आम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि म्हणून आम्ही इथे आहोत.  तुम्हाला सत्तेत येण्याची इतकी घाई का?

आज सकाळी जेव्हा प्रस्तावावर चर्चा, मतदान काहीही झाले नव्हते, तेव्हा एक सदस्य धावत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले-उठा,उठा, उठा….

केवळ एका मोदीला हटवण्यासाठी, ते आज कोणाकोणाला एकत्र आणत आहेत बघा..

आपण इथे आपला स्वार्थ साधण्यासाठी आलेलो नाही.

आम्ही इथे आहोत ते आपल्या सव्वाशे कोटी जनतेच्या आशीर्वादाने.

आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र मनात ठेवून देशाची सेवा करतो आहोत.

देशात गेल्या ७० वर्षांपासून अंधारात असलेल्या १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम आमच्या सरकारने पूर्ण केले.

यापैकी बहुतांश गावे, पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील होती.

मला या सदस्यांना आज सांगायचे आहे, की आम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि म्हणून आम्ही इथे आहोत.

तुम्हाला सत्तेत येण्याची इतकी घाई का?

आज सकाळी जेव्हा प्रस्तावावर चर्चा, मतदान काहीही झाले नव्हते, तेव्हा एक सदस्य धावत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले-उठा,उठा, उठा….  

केवळ एका मोदीला हटवण्यासाठी, ते आज कोणाकोणाला एकत्र आणत आहेत बघा..

आपण इथे आपला स्वार्थ साधण्यासाठी आलेलो नाही.

आम्ही इथे आहोत ते आपल्या सव्वाशे कोटी जनतेच्या आशीर्वादाने.

आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र मनात ठेवून देशाची सेवा करतो आहोत.

देशात गेल्या ७० वर्षांपासून अंधारात असलेल्या १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम आमच्या सरकारने पूर्ण केले.

यापैकी बहुतांश गावे, पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील होती.

अतिशय वेगाने देशभरात शौचालये बांधण्यात आली.

उज्ज्वला योजनेमुळे हजारो महिलांना चुलीच्या धूराच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे.

आमच्या सरकारने गरिबांसाठी बँक खाती सुरु केली. याआधी सामान्य माणसांसाठी बँकेचे दरवाजे खुले नव्हते.

आमच्याच सरकारने देशातील गरीब जनतेला आरोग्याच्या उत्तम सेवा-सुविधा देणारी आयुष्मान भारत ही योजना आणली आहे: पंतप्रधान

कडुलिंबाचे आवरण असलेल्या युरियामुळे शेतकऱ्याना मोठा फायदा झाला आहे.

स्टार्ट-अप कंपन्यांच्या क्षेत्रात भारताने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे.मुद्रा योजनेमुळे अनेक युवकांची स्वप्ने साकार होत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था बळकट होत आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही आज भारत करत आहे.

काळ्या पैशांविरुद्धचा लढा सुरु आहे आणि तो पुढेही सुरु राहिलच, या लढ्यामुळे अनेक लोक माझे शत्रू बनले आहेत, तरीही काही हरकत नाही.

कांग्रेसचा मुख्य निवडणूक आयोगावर विश्वास नाही, न्यायपालिकेवर विश्वास नाही, रिझर्व बँकेवर नाही,आंतरराष्ट्रीय पतसंस्थावर नाही… कारण त्यांचा स्वतःवर विश्वास नाही.

आपण आज इथे कशाला आलो आहोत? प्रत्येक गोष्टीत बालीशपणा करायचा नसतो.

आज इथे कोणीतरी नेते डोकलाम बद्दल बोलले. हे तेच नेते आहेत , ज्यांनी आपल्या देशाच्या लष्करापेक्षा चीनच्या राजदूतांवर विश्वास ठेवला.

राफेल कराराविषयी, तुम्ही संसदेत केलेल्या एका बेजबाबदार वक्तव्यामुळे, दोन्ही देशांना आपले निवेदन जारी करावे लागले.

माझी कॉंग्रेसला विनंती आहे की देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्याचे राजकारण करु नका.

आमच्या सैन्यदलांचा असा अवमान मी कधीही खपवून घेणार नाही.

तुम्हाला माझ्यावर जेवढी टीका करायची तेवढी करा,मात्र देशाच्या जवानांचा अपमान करणे बंद करा.

तुम्ही सर्जिकल स्ट्राईकला जुमला स्ट्राईक म्हणता?

मला आज १९९९ सालातली गोष्ट आठवली, जेव्हा त्या राष्ट्रपती भवनासमोर उभ्या राहिल्या होत्या आणि म्हणाल्या की, आमच्याकडे आताच २७२ इतके संख्याबळ आहे आणि आणखी लोकही आमच्यासोबत येणार आहेत.त्यांनी अटलजींचे सरकार पाडले मात्र स्वतःचे सरकार स्थापन करु शकल्या नाहीत.

आज मी एक वक्तव्य वाचले-“कोण म्हणतय, की आमच्याकडे संख्याबळ नाही?” 

कॉंग्रेसने चरणसिंगासोबत काय केले? चंद्रशेखरजीसोबत काय केले? देवेगौडांचे काय केले? आय के गुजरालजीचे काय केले?

देशाने दोनदा कॉंग्रेसला पैसे देऊन मते विकत घेतांना पाहिले आहे.

आज कोणीतरी सभागृहात कसा डोळा मारला, हे सगळ्या देशाने पहिले.

कॉंग्रेसनेच आंध्रप्रदेशाची विभागणी केली आणि त्यांची तेव्हाची कृती लज्जास्पद होती.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या विकासासाठी रालोआ सरकार कटीबद्ध आहे.

वायएसआरसीपी सोबत चालू असलेल्या तुमच्या अंतर्गत राजकारणामुळेचा तुम्ही हे करताय. मी आंध्रप्रदेशच मुख्यमंत्र्यांनाही हे सांगितले.

मला आंध्रप्रदेशाच्या जनतेला सांगायचे आहे आहे कि आमचे सरकार तुमच्या भल्यासाठी काम करतच राहील. आंध्रप्रदेशाच्या विकासासाठी 

आम्ही सर्वतोपरी मदत करु.

त्यांनी त्यांच्या भांडवलदार मित्रांना केवळ एक फोन करून कर्ज उपलब्ध करुन दिले, त्याचा फटका मात्र आज देशाला बसतोय.

मला आज तुम्हाला एनपीए म्हणजे अनुत्पादक मालमत्तांविषयी सांगायचे आहे. इंटरनेट बँकिंगच्या कितीतरी आधी, कॉंग्रेसने ही “फोन 

बँकिंग”सुविधा सुरु केली होती, आणि त्यातूनच हा एनपीएचा राक्षस उभा राहिला.

मुस्लीम महिलांच्या न्यायासाठीच्या लढाईत केंद्र सरकार त्यांच्यासोबत उभे आहे.

देशात कुठल्याही भागात घडलेल्या हिंसेच्या घटना संपूर्ण देशासाठी लांच्छनास्पद आहेत.मी सर्व राज्यसरकारांना पुन्हा विनंती करतो की 

त्यांनी अशा हिंसा करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी.

भारतात आज अत्यंत वेगाने रस्ते बनवण्याचे काम सुरु आहे , गावे एकमेकांशी आणि शहरांशी जोडली जात आहेत,ई-वे तयार केले जात 

आहेत, रेल्वेचा विकास होतो आहे.  

 

***

B.Gokhale / R. Aghor