Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या हिवाळी सत्राच्या प्रारंभी पंतप्रधानांचे संबोधन

संसदेच्या हिवाळी सत्राच्या प्रारंभी पंतप्रधानांचे संबोधन


आपणा सर्वांना नमस्कार.

आजपासून संसदेच्या हिवाळी सत्राला सुरुवात होत आहे.

यापूर्वीच्या सत्रात जीएसटीसारख महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यामुळे देशात एकाच कर व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदनाने मोठे काम केले आहे. मी त्या दिवशी सुद्धा सर्व पक्षांचे आभार मानले होते. देशहितासाठी जेंव्हा सर्व पक्ष सोबत पुढे जातात तेंव्हा निर्णय सुद्धा चांगले होतात, लवकर होतात आणि त्यांचा चांगला परिणाम सुद्धा दिसून येतो.

या सत्रात सुद्धा खूप चांगली चर्चा होणार आहे. सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. पक्षांच्या स्वत:च्या राजकीय विचारांच्या आधारेही चर्चा होईल. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि आवश्यकतांच्या संदर्भात चर्चा होईल. सरकाराच्या विचारानुसार चर्चा होईल आणि मला असे वाटते की, या सत्रात खूप चांगली चर्चा होईल. सर्व पक्ष सर्वोत्तम योगदान देतील.

सरकारतर्फे प्रस्तावित कामकाजाचे विषय पूर्ण करण्याबरोबरच सर्व पक्षांना सोबत घेऊनचं पुढे जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. वस्तू सेवा कराचे काम पुढे सुरु ठेवण्यासाठी सर्व राज्य सरकारांसह तसेच सर्व राजकीय पक्षांसह सतत बैठका होत आहेत. कामकाजापूर्वी सुद्धा सर्व पक्षांसोबत सातत्याने विचार विनिमय होत राहिला आहे.

प्रत्येक विषयाच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असेच सरकारचे मत आहे. खुल्या वातावरणातील चर्चेला आम्ही तयार आहोत आणि त्याचमुळे खूप चांगल्या, महत्त्वपूर्ण निर्णयांच्या दृष्टीने अनुकुलता कायम राहील.

मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.