Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य


नमस्कार मित्रहो,

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस मृद्‌गंध निर्माण करतो तसेच हे पावसाळी अधिवेशन जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे नवचैतन्यानं भारले आहे. जेव्हा देशातले सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकारं केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचा विचार करुन निर्णय घेतात तेव्हा केवढे मोठे राष्ट्रहिताचे कार्य होते ते जीएसटीच्या यशातून सिद्ध झाले आहे. “एकत्र बलवान होऊ” ही जीएसटीमागची प्रेरणा आहे. ही प्रेरणा या अधिवेशनातही वृद्धिंगत होवो.

हे अधिवेशन अनेकदृष्ट्या महत्वाचे आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून सात दशकं पूर्ण होत आहेत. 9 ऑगस्टला 75 वर्ष होत आहेत. “ छोडो भारत” चळवळीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याच अधिवेशनात देशाला नवे रार्ष्टपती आणि उपराष्ट्रपती निवडण्याची संधी मिळत आहे. एक प्रकारे देशाच्या वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा हा कालखंड आहे. त्यामुळे साहजिकच देशवासियांचे लक्ष या पावसाळी अधिवेशनावर विशेषत्वाने राहील.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला आम्ही देशातल्या शेतकऱ्यांना अभिवादन करतो. या मोसमात कठोर परिश्रम घेऊन शेतकरी देशवासियांच्या अन्नधान्याची सोय करुन अन्नसुरक्षा देतात.

या पावसाळी अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष, सर्व माननीय संसद सदस्य राष्ट्रहिताचे महत्वाचे निर्णय घेतील. उत्तम चर्चा करतील. प्रत्येक निर्णयात, व्यवस्थेत आपले मौलिक योगदान देण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करु, असा मला विश्वास वाटतो.

तुम्हा सर्वांना धन्यवाद !

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar