Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संविधान दिन चर्चा – पंतप्रधानांतर्फे डॉ. आंबेडकरांच्या अतुलनीय योगदानाची प्रशंसा


भारताची राज्यघटना ही केवळ कायदेशीर दस्तावेज नसून तो एक सामाजिक दस्तावेज देखील आहे असे पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी सांगितले. जेव्हा कधी आपल्याला मार्गदर्शन आणि प्रेरणेची गरज भासेल तेव्हा आपण याची पाने उलटू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त संविधान दिनाचे औचित्य साधत आयोजित चर्चेदरम्यान मोदी बोलत होते.

राज्यघटना आपल्याला एकसंघटित होऊन पुढे मार्गक्रमण करण्याची शक्ती प्रदान करते. संविधान सभेच्या सर्व सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करायची ही उत्तम संधी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरु शकत नाही असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी यावेळी “एक भारत श्रेष्ठ भारत” या आपल्या व्हिजनचा आराखडा सादर केला ज्याचा उल्लेख त्यांनी सर्वप्रथम सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “एकता के लिए दौड”या कार्यक्रमा दरम्यान केला होता. आपल्या वक्तव्या दरम्यान पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरु, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मॅक्स मूलर यांचा उल्लेख केला.

S.Mhatre/B.Gokhale