संरक्षण सेवेत 30 डिसेंबर 1991 ते 29 नोव्हेंबर 1999 या काळात कार्यरत असलेल्या आणि निधन अथवा काही कारणाने सेवेतून बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या संचित रजेचा मोबदला देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ 15 वर्षांपेक्षाही कमी आहे अशा कर्मचाऱ्यानाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 180 दिवसांची संचित रजा विकून त्याचा मोबदला घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
संरक्षण क्षेत्रातील 9777 अधिकाऱ्यांची कुटुंबे आणि इतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. याच काळात कारगिल युध्द आणि ऑपरेशन विजय तसेच जम्मू कश्मीर आणि ईशान्य भारतातून मोठी घुसखोरी झाल्यामुळे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ महत्वाचा असून या काळात पराक्रम गाजवलेल्या सर्व वीरांना आणि त्यांच्या कुटुंबाना या निर्णयाचा लाभ मिळेल.
B.Gokhale/ R.Aghor/P.Malandkar