Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्र पॅरिस परिषदेतील हवामान बदल वाटाघाटीबाबत भारताने मांडलेल्या भूमिकेला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मोरोक्को येथील मराकेश येथे ७-१८ नोव्हेंबर,२०१६ दरम्यान झालेल्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र पॅरिस परिषदेतील हवामान बदल वाटाघाटीबाबत भारताने मांडलेल्या भूमिकेल कार्योत्तर मंजुरी दिली.

गरीब आणि वंचित गटांच्या हिताचे संरक्षण करणे हा हवामान बदलाबाबत भारताने मांडलेल्या भूमिकेचा उद्देश आहे. यामध्ये देशातील समाजातील सर्व घटकांचे हित लक्षात घेण्यात आले आहे.

देशाची वाढ आणि विकास यांचा संबंध हरित वायू उत्सर्जनाशी निगडित आहे. हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा सामना करताना भारत आणि विकसनशील देशांचा विकास अवकाश अबाधित राखणे गरजेचे आहे. भारताच्या दृष्टिकोनामुळे हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

(B.Gohale/S.Kane)