Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्रांच्या ‘भविष्यासाठी शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

संयुक्त राष्ट्रांच्या ‘भविष्यासाठी शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


महामहिम, 

जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातर्फे आणि 1.4 अब्ज भारतीयांतर्फे आपल्या सर्वांना नमस्कार! नुकतेच जून महिन्यात, मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या निवडणुकीत भारतातल्या लोकांनी मला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. आणि आज मी हाच मानवतेचा एक षष्ठांश आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. 

मित्रांनो, 
आपण  जागतिक भविष्याबाबत चर्चा करत असताना मानवकेंद्रित दृष्टिकोन सर्वप्रथम राहायला हवा. शाश्वत विकासाला प्राधान्य देत आपल्याला मानव कल्याण, अन्न, आरोग्य सुरक्षादेखील सुनिश्चित करावी लागेल. भारतात 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढून शाश्वत विकास यशस्वी होऊ शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. यशाचा हा आमचा अनुभव आम्ही ग्लोबल साऊथसोबत सामायिक करण्यास तयार आहोत. 

मित्रांनो, 
मानवतेचे यश आपल्या सामूहिक शक्तीत आहे, रणांगणात नवे. आणि वैश्विक शांती व  विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. सुधारणा ही प्रासंगिकतेची गुरुकिल्ली आहे ! नवी दिल्ली शिखर परिषदेत आफ्रिकन संघाला जी 20 चे स्थायी सदस्यत्व हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकीकडे दहशतवादासारखा मोठा धोका आहे, तर दुसरीकडे सायबर, सागरी, अवकाश यांसारखी संघर्षाची अनेक नवी क्षेत्रेही निर्माण होत आहेत.  या सर्व विषयांवर मी ठामपणे सांगू इच्छितो की, जागतिक कृती जागतिक महत्त्वाकांक्षेशी जुळणारी असायला हवी. 

मित्रांनो, 
तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी संतुलित नियमन आवश्यक आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित ठेवणाऱ्या अशा जागतिक डिजिटल प्रशासनाची आपल्याला गरज आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हा एक पूल असावा, अडथळा  नव्हे ! जागतिक हितासाठी, भारत आपली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संपूर्ण जगासोबत सामायिक करण्यास तयार आहे.

मित्रांनो,
भारतासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” ही वचनबद्धता आहे. ही वचनबद्धता आमच्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” आणि “एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” यासारख्या पुढाकारांमध्येदेखील दिसून येते. संपूर्ण मानवतेच्या हितांचे संरक्षण आणि वैश्विक समृद्धीसाठी भारत विचार,वाणी आणि कृतीतून  काम करत राहील.  

खूप खूप धन्यवाद !

***

SonalT/SonaliK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai