म्यानमारमधल्या सितागू इंटरनॅशनल बुध्दीस्ट अकादमीचे संस्थापक कुलपती सन्माननीय सायादा डॉ. आसिन न्यानिसारा,
श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा,
जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मिनोरू कियूची,
पूज्य श्री श्री रवि शंकर,
मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ. महेश शर्मा आणि किरेन रिजीजू,
विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे संचालक जनरल एन.सी.विज,
जपानमधल्या दि टोकीयो फाऊंडेशनचे अध्यक्ष मासाहिरो अकियामा,
लामा लोबजांग,
सन्माननीय धार्मिक आणि आध्यात्मिक नेते, महासंघातील पूजनीय धर्मगुरु
संघर्ष टाळणे आणि पर्यावरणाविषयी जागृती यावरील “संवाद” या जागतिक हिंदू-बौध्द उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित असल्याबद्दल मला आनंद होत आहे. बौध्द धर्म प्रामुख्याने जिथे जीवन जगण्याचा मार्ग आहे त्या जगभरातल्या अनेक देशांचे नेते, आध्यात्मिक नेते आणि विद्वान यांचे हे सर्वोच्च संमेलन आहे. बोधगयेसह भारतात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे, ही खूपच आंनदाची गोष्ट आहे, अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित करण्यासाठी भारत हे आदर्श ठिकाण आहे. गौतम बुध्दांनी या भूमीतून बौध्द धर्माची तत्त्वप्रणाली जगाला दिली, याचा आम्हाला अभिमान आहे.
गौतम बुध्दांचे जीवन सेवा, दया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याग यांची ताकद विषद करते. श्रीमंतीत ते जन्मले. तुलनेने हालअपेष्टांचा सामना त्यांना करावा लागला नाही तरीही आजारपण, वृध्दत्व आणि मृत्यू, मानवी दु:ख याबाबतची जाणीव त्यांना वयानुसार झाली. भौतिक संपत्ती हेच एकमात्र लक्ष्य नाही याबाबत ते ठाम होते. माणसामाणसातील संघर्षामुळे ते व्यथित झाले. त्यानंतर शांततामय आणि दयाळू समाज निर्माण करण्याच्या मार्गावरुन ते निघाले. प्रतिगामी पध्दती, रुढीपरंपरा यातून सुटकारा मिळवून देण्यासाठी समाजाला चुका दाखवण्याचे धैर्य, ठामपणा त्याकाळी त्यांच्याकडे होता.
गौतम बुध्द क्रांतिकारी होते. दुसरे काही नाही तर मनुष्य हा केंद्रस्थानी असल्याचा विश्वास जोपासला. मनुष्याच्या अंतरात्म्यात देवत्व असते. एका परीने त्यांनी देवाशिवाय विश्वास निर्माण केला. विश्वास जिथे देवत्व म्हणजे कुठेही बाहेर डोकावणे नव्हे तर स्वत:मध्ये डोकावणे. तीन शब्दात “अप्प दीपो भव” अर्थात स्वत:च स्वत:चे दिवा (मार्गदर्शक) व्हा. गौतम बुध्दांनी मानवाच्या सर्वात मोठा व्यवस्थापनाचा पाठ घालून दिला. अविषारी संघर्ष आणि त्यामुळे मानवाचा वाटयाला येणारे दु:ख याच्या त्यांना सर्वाधिक यातना व्हायच्या. अहिंसा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग होता.
संघर्ष टाळणे, पर्यावरणविषयक जागृती वृध्दिंगत करण्यासाठी वाटचाल करणे आणि मुक्त व मोकळा संवाद या बुध्दांच्या शिकवणीतल्या महत्त्वाच्या संकल्पना होत्या.
तीनही संकल्पना वेगवेगळया भासत असल्या तरी पूर्णपणे अभिन्न नाहीत, उलट त्या परस्परांवर अवलंबून आहेत आणि परस्परांना पूरक आहेत.
माणसा-माणसातला, धर्मातला, समुदायातला, राष्ट्रातला आणि अराजक तत्त्वं आणि राज्य आणि अगदी राष्ट्रातला संघर्ष ही पहिली संकल्पना आहे.
असहिष्णू असामाजिक अराजकवादी तत्वांनी सध्या मोठा भूभाग व्यापला असून निष्पाप लोकांवर ते हिंसाचार लादत आहेत. दुसरा संघर्ष आहे निसर्ग आणि मानव, निसर्ग आणि विकास आणि निसर्ग आणि विज्ञानातला. या प्रकारचे संघर्ष टाळण्यासाठी गरज आहे संवादाची, आणि तोही सध्या जसा आहे त्याप्रमाणे केवळ देवघेव स्वरुपातल्या ठरावाच्या वाटाघाटीप्रमाणे नव्हे.
हवामानविषयक जागृती आणि वापराविषयी संयमाच्या नैतिक मूल्यांची पाळेमूळे आशियाई तत्वज्ञान विषयक विशेषत: हिंदू आणि बौध्द तत्वज्ञानात रुजलेली आहेत.
कन्फ्युशियस, ताओ आणि शिंटो बरोबर बौध्द विचारधारेनेही पर्यावरण रक्षणाची मोठी जबाबदारी उचलली आहे. हिंदू आणि बुद्ध धर्म आपल्या महान सिद्धातांच्या आधारावर जागतिक दृष्टीकोनात बदल घडवून आणू शकतात.
हवामानबदल हे जागतिक आव्हान आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आणि सर्वंकष प्रतिसादाची गरज आहे. भारतात पूर्वापार निसर्ग आणि श्रध्दा एकमेकांना जोडले गेले आहेत. बौध्द तत्वज्ञान आणि पर्यावरण यांचा सखोल संबंध आहे.
बौध्द परंपरेनुसार कोणालाही स्वतंत्र अस्तित्व नाही त्यामुळे निसर्गाशी मानवाच्या तादात्म्याला ही परंपरा प्रोत्साहन देते. हवामानातल्या अशुध्दतेचा मनावर परिणाम होतो तर, मनातल्या अशुध्दतेमुळे पर्यावरण प्रदुषित होते. पर्यावरण शुध्द ठेवण्यासाठी आपल्याला मन निर्मळ ठेवावे लागले. पर्यावरणविषयक समस्या म्हणजे असंतुलित मनाचेचे प्रतिबिंब आणि म्हणूनच भगवान बुध्दांनी नैसर्गिक साधनसंपत्तींच्या संरक्षणाला महत्त्व दिले आणि जलसंवर्धनाची साधने निर्माण केली. तसेच बौध्द भिक्षूंना जलसंसाधन प्रदूषित करण्यापासून रोखलं. भगवान बुध्दांच्या शिकवणीत निसर्ग, जंगले, वृक्ष आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
मी लिहिलेल्या “कन्हिनियंट ॲक्शन” या पुस्तकाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशन झाले. हवामान बदलाचा सामना करताना मुख्यमंत्री या नात्याने मला आलेले अनुभव मी या पुस्तकात विशद केले आहेत.
वेदविषयक साहित्याच्या वाचनाने मला मानव आणि निसर्ग यांच्यातल्या दृढ संबंधाविषयी ज्ञान दिले. महात्मा गांधीजीच्या विश्वस्त तत्वाविषयी आपणा सर्वांना माहिती आहेच.
यासंदर्भात सध्याच्या पीढीने भावी पिढीसाठी नैसर्गिक संपत्तीचे विश्वस्त म्हणून काम करावे असे मला वाटते. केवळ हवामानाबदलाचा मुद्दा नाही तर हवामानाला न्याय देण्याचा मुद्दा आहे. मी पुन्हा एकवार सांगू इच्छितो की हा केवळ हवामान बदलाचा मुद्दा नाही तर हवामानाला न्याय देण्याचा मुद्दा आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका बसतो तो सर्वाधिक गरीब आणि वंचिताना सं मला वाटते. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम याच लोकांवर होतो. पूर येतो तेवहा हेच बेघर होतात जेव्हा भूकंप होतो तेवहा यांचीच घर ढासळतात. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आणि थंडीच्या लाटेतही याच लोकांना सर्वाधिक कष्ट झेलावे लागतात. हवामान बदलाचा फटका या पध्दतीनं त्यांना बसू नये याकडे देण्याची गरज आहे म्हणून माझं म्हणणं आहे की चर्चा हवामान बदलाऐवजी त्याला न्याय देण्यावर हवी. जेव्हा तिसरी संकल्पना आहे संवादाला प्रोत्साहन. योग्य संवादावाचून संघर्ष टाळणे शक्य नाही.
संघर्ष टाळण्यासाठीच्या यंत्रणेतल्या आपल्या मोठया त्रुटी जास्तीत जास्त उघड होत आहेत. हिंसाचार आणि रक्तपात थांबविण्यासाठी आपल्याला ठोस, एकत्रित आणि धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. आणि म्हणूनच जग बौध्द धर्माची दखल घेत आहे याचे आश्चर्य वाटायला नको. ऐतिहासिक आशियाई परंपरा आणि तत्वांची ही ओळख आहे.
या परिषदेच्या संपूर्ण संकल्पनेचे सार सामावले ते संघर्ष टाळणं आणि पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्यात. तुम्ही विरुध्द आम्ही या विचारधारेऐवजी तत्वज्ञानविषयक दृष्टीकोन अंगीकारण्याची गरज आहे.
विचारधारा मग ती धार्मिक असो वा निधर्मी विचारधारेकडून तत्वज्ञानाकडे आपला मोहरा वळविण्याची गरज आहे याची माहिती जगाला देण्याची गरज आहे. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघातही मी याचा उल्लेख केला होता. त्यानंतर एक दिवसाने मी विदेशी संबंधविषयक परिषदेला संबोधित केले त्यावेळी मी या संकल्पनेचा थोडा विस्तार केला. तत्वज्ञान म्हणजे झापडबंद विचार नाही मात्र विचारधारा ही बंदिस्त असू शकते हे तत्वज्ञानाचे सार आहे.
तत्त्वज्ञान केवळ संवादच साधत नाही, तर तत्त्वज्ञान म्हणजे संवादाच्या माध्यमातून सत्याचा चिरकाल शोध आहे. उपनिषदाचे संपूर्ण वाड्:मय हे विविध संवादाचे एकत्रीकरण आहे. विचारधारा म्हणजे नि:संशय सत्य होय. त्यामुळे ज्या विचारधारा संवादाचे द्वार बंद करतात, त्यांच्यात हिंसाचाराचा शिरकाव होण्याची शक्यता असते. मात्र तत्वज्ञान संवादाच्या माध्यमातून हा मार्ग टाळण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळेच हिंदू आणि बौध्द धर्म हे खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानाने अधिक परिपूर्ण असून, हे दोन्ही धर्म केवळ विचारधारा नाहीत.
सर्व समस्यांचे समाधान हे संवादातच असते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शक्ती म्हणजे सत्ता असा पूर्वी समज होता. आता सत्ता ही, विचारांची शक्ती आणि परिणामकारक संवादातूनच आली पाहिजे. आपण युध्दाचे विपरीत परिणाम पाहिले आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन जागतिक महायुध्दांचे सारे साक्षीदार आहेत.
आता युध्दाचे तंत्र बदलते आहे आणि धोकेही वाढत आहेत. आता केवळ एक बटण दाबण्याने काही मिनिटातच लाखोंचे प्राण जाऊ शकतात किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या युध्दाचा प्रारंभ होऊ शकतो.
आपल्या भावी पिढया शांततामय, परस्परांविषयी आदर आणि प्रतिष्ठेचे जीवन जगू शकतील, हे निश्चित करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी आपण संघर्ष विरहीत जगाची बीजे रोवली पाहिजेत आणि या कार्यात बौध्द आणि हिंदू धर्म यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
जेव्हा आपण “संवादा” बद्दल बोलतो, तेव्हा हा संवाद कसा असला पाहिजे ? हा संवाद कोणत्याही द्वेषा विना किंवा बदल्याच्या भावनेविना असला पाहिजे. आदी शंकराचार्य आणि मंडण मिश्रा यांच्यातील संवाद, हे अशा प्रकारच्या संवादाच्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे.
आजच्या आधुनिक काळात या प्राचीन उदाहरणाचे वर्णन करणे आणि ते पुन्हा आठवणे, हे निश्चितच फायदेशीर आहे. धार्मिक प्रथांना अधिक महत्त्व न देणारे, वैदिक पध्दतीचे पुरस्कर्ते आदी शंकराचार्य हे तरुण होते, तर मंडण मिश्रा हे वयोवृध्द ज्ञानी आणि पशुबळींसह इतर धार्मिक प्रथांवर विश्वास ठेवणारे होते.
धार्मिक प्रथांविषयक सर्वोच्च ज्ञान असणाऱ्यांबरोबर, आदी शंकराचार्यांना वाद-विवादातून संवाद साधायचा होता आणि मुक्ती मिळण्यासाठी धार्मिक विधी आवश्यक नसतात, हे सिध्द करायचे होते. तर धार्मिक विधी नाकारणारे शंकराचार्य चुकीचे हे मंडण मिश्रांना सिध्द करायचे होते. त्यामुळे प्राचीन भारतात, असे विषय संघर्षातून सोडवण्याऐवजी, ज्ञानी व्यक्तींच्या संवाद आणि वाद-विवादातून सोडवले जात. आदी शंकराचार्य आणि मंडण मिश्रा यांच्यात वाद-विवाद झाला. आदि शंकराचार्य जिंकले. पण या दोघांमधील वाद विवाद हा महत्त्वाचा नसून, हा विवाद कशाप्रकारे झाला हे अधिक महत्त्वाचे आहे. ही सर्वच गोष्ट अतिशय उत्कंठापूर्ण असून, मानवी इतिहासातील सर्वाधिक उच्च दर्जाच्या विवादांपैकी एक विवाद ठरला आहे.
या विवादात मंडण मिश्रांची हार झाली, तर ते गृहस्थाश्रमाचा त्याग करुन, संन्यास स्वीकारतील, असे निश्चित झाले होते आणि जर आदी शंकराचार्य हरले तर ते संन्यासाश्रमाचा त्याग करुन विवाहबध्द होऊन, गृहस्थाश्रम स्वीकारतील असे ठरले होते. ज्येष्ठ ज्ञानी असणाऱ्या मंडण मिश्रांनी तरुण असणारे आदी शंकराचार्य हे आपल्या बरोबरीचे नसल्याचे समजून शंकराचार्यांनी आपल्या पसंतीचा निर्णयाधिकारी निवडावे, असे सुचवले. आदी शंकराचार्यांनी ज्ञानी असणाऱ्या मंडण मिश्रांच्या पत्नीची निर्णयाधिकारी म्हणून निवड केली. जर मंडण मिश्रा हरले असते, तर त्यांना आपला नवरा गमवावा लागला असता. तिने मंडण मिश्रा आणि आदि शंकराचार्य या दोघांनी ताज्या फुलांचा हार घालावा असे सांगितले आणि त्यानंतर विवादाला प्रारंभ केला. ज्या कुणाचा पुष्पहार प्रथम सुकेल, तो पराभूत झाल्याचे जाहीर केले जाईल असे स्पष्ट केले. हे असे का केले असावे ? कारण, जर या दोघांपैकी जो चिडेल वा संतापेल, त्याच्या शरीरात उष्णता निर्माण होईल, आणि या उष्णतेमुळे हारातील फुले सुकतील. अंतर्गत क्रोध हे हरण्याचे लक्षण आहे, आणि या तर्कशास्त्रानुसार मंडण मिश्रा यांची हार झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांनतर मंडण मिश्रा यांनी संन्यास घेतला आणि ते शंकराचार्यांचे शिष्य झाले. या सगळयातून या विवादातील चैतन्य दिसून येते आणि हा सर्व संवाद क्रोध अथवा संघर्षाशिवाय होता हे ही दिसून आले.
आज या ठिकाणी आपण वेगवेगळी जीवनशैली असणारे विविध देशांतील नागरिक एकत्र आले आहेत. पण आपल्या संस्कृतीची पाळेमुळे ही आपल्या समान असणाऱ्या इतिहास, तत्वज्ञान आणि वारश्यात आहेत, आणि यातूनच आपण सारे जोडले गेलो आहोत. बौध्द धर्म आणि बौध्द धर्माचा वारसा हा सर्वांना एकत्र आणणारा महत्वपूर्ण दुवा आहे.
सध्याचे शतक हे आशियाचे शतक असेल, असे म्हटले जाते. मात्र गौतम बुध्दांनी दाखवलेला मार्ग आणि तत्व यांचा अंगीकार केला नाही, तर हे आशियाई शतक प्रत्यक्षात येणार नाही, याबाबत मला खात्री आहे.
जागतिक व्यापारामुळे आपल्या एकत्रित आर्थिक कल्याणावर जो परिणाम झाला आणि डिजिटल इंटरनेटचा आपल्या एकत्रित बौध्दिक कल्याणावर झाला तसाच परिणाम भगवान बुध्दांमुळे आपल्या एकत्रित आध्यात्मिक कल्याणावर झाला आहे.
एकविसाव्या शतकात भगवान बुध्द हे राष्ट्रीय सीमा ओलांडून, विविध धर्मांच्या, विविध राजकीय विचारधारांना ओलांडून, आपल्यात संयमाचा पूल बांधतांना मला दिसताहेत आणि आपल्यात सहिष्णुता जागृत करतांनाही दिसताहेत.
आपल्या बौध्द धर्माच्या वारश्याबद्दल अभिमान बाळगणाऱ्या देशाला तुम्ही भेट देत आहात. गुजरातमधील माझे मूळ गाव वडनगर हे अशा अनेक ठिकाणांपैकी एक आहे, ज्याला प्रवासी हयू-एन-त्संगनं भेट दिली होती आणि या ठिकाणी बौध्दकालिन अवशेष आढळले आहेत.
सार्क विभागात लुंबिनी, बोध गया, सारनाथ, कुशीनगर ही बौद्ध धर्माची पवित्र स्थळं आहेत. आसियान राष्ट्र तसेच चीन, कोरिया, जपान, मंगोलिया आणि रशियातूनही यात्रेकरु येथे येतात.
भारतात बौद्ध परंपरेला चालना देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले माझे सरकार उचलत आहे आणि ही संस्कृती आशियात बहरावी यासाठी भारत पुढाकार घेत आहे. तीन दिवसांची ही परिषद हा याचाच एक भाग आहे.
पुढचे तीन दिवस अर्थपूर्ण चर्चा होईल अशी मी आशा बाळगतो. आपण सगळे एकत्र येऊन शांततामय, संघर्ष टाळण्याचा दृष्टीने तसेच स्वच्छ आणि हरित जगासाठी विचारविनिमय करु.
एक दिवसानंतर बोधगया येथे होणाऱ्या भेटीसाठी मी उत्सुक आहे.
धन्यवाद
S. Kulkarni+N.Chitale+J.Patnakar/S.Tupe
The key themes of Samvad are conflict avoidance, environmental consciousness & dialogue. Looking forward to fruitful discussions.
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2015
Am delighted to be here at inauguration of Samvad the Global Hindu-Buddhist Initiative on Conflict Avoidance & Environment Consciousness: PM
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
It is a matter of immense happiness that this conference is being held in India, including in Bodh Gaya: PM https://t.co/QttMqG6YDz
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
We in India are proud of the fact that it was from this land that Gautama Buddha gave the world the tenets of Buddhism: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
The life of Gautama Buddha illustrates the power of service compassion and, most importantly renunciation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
He was convinced that material wealth is not the sole goal. Human conflicts repulsed him: PM @narendramodi on Gautam Buddha
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Intolerant non-state actors now control large territories where they are unleashing barbaric violence on innocent people: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Climate change is a pressing global challenge: PM @narendramodi https://t.co/QttMqG6YDz
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
The nature, forests, trees and the well being of all beings play a great role in the teachings of Lord Buddha: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Personally, it is my reading of Vedic literature that educated me about the strong bond between humans and Mother Nature: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
The most adversely affected by climate change are the poor and the downtrodden: PM @narendramodi https://t.co/QttMqG6YDz
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
It is my firm belief that the solution to all problems lies in dialogue: PM https://t.co/QttMqG6YDz
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Without embracing the path and ideals shown by Gautam Buddha, this century cannot be an Asian century: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Lord Buddha continues to inspire. pic.twitter.com/YtlWwjO7vG
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Lord Buddha and our collective spiritual well-being. pic.twitter.com/2ga7xfvVMA
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Across borders, faiths...playing the role of a bridge, enlightening us with values of tolerance and empathy. pic.twitter.com/RUy5t5rnw4
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Power isn't about force. Power must come through strength of ideas & dialogue. pic.twitter.com/wXphVVzcfz
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Towards an Asian Century. pic.twitter.com/uxIbjKGciS
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Let us give our future generations a life of peace & dignity. pic.twitter.com/VjP58kCiag
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015
Climate justice, not merely climate change...it is our responsibility towards the future generations. pic.twitter.com/djQwYvp1Cq
— PMO India (@PMOIndia) September 3, 2015