पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने संघटित गट ‘अ’ इंजिनिअरिंग सेवा म्हणून इंडियन नेव्हल मटेरियल मॅनेजमेंट सर्विसच्या स्थापनेला आणि भारतीय नौदलाच्या नौदल स्टोअर अधिकाऱ्यांच्या सध्याच्या ‘अ ‘ कॅडरच्या आराखड्यात बदल करायला मंजुरी दिली .
संघटित गट ‘अ’ इंजिनिअरिंग सेवेच्या स्थापनेमुळे सर्वोत्तम प्रतिभावान आणि तांत्रिकदृष्ट्या पात्र मटेरियल व्यवस्थापक उपलब्ध होतील. नौदल स्टोअर्सच्या सामुग्री व्यवस्थापनाच्या क्रियान्वयन क्षमतेत सुधारणा होईल आणि नौदलाची परिचालन सज्जता कायम राहील.
B.Gokhale/S.Kane/Anagha