Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा


 

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट निर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अयोध्येत राम मंदिर उभारणीबाबत सर्व निर्णय ट्रस्ट घेऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येसंदर्भातल्या ऐतिहासिक निकालानुसार निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावी, अशी केंद्र सरकारने, उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आणि राज्य सरकारने त्याचा स्वीकार केला.

भारतीय संस्कृतीत प्रभू राम आणि अयोध्या यांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व आपण सर्व जाणतोच. उत्कृष्ट राम मंदिराच्या उभारणीसाठी आणि भविष्यात राम लल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुमारे 67.703 एकर अधिग्रहीत जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

देशातल्या जनतेने दाखवलेल्या प्रगल्भतेची पंतप्रधानांकडून प्रशंसा

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शांतता आणि सलोखा राखण्यात देशाने दाखवलेल्या प्रगल्भतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

याचा पुनरुच्चार त्यांनी स्वतंत्र ट्विटरद्वारे केला आहे. भारतातल्या जनतेने लोकशाही प्रक्रियेवर लक्षणीय विश्वास दर्शवला आहे. भारतातल्या 130 कोटी जनतेला सलाम.

 

भारतात राहणारे सर्व समुदाय एक मोठे कुटुंब

आपण सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. प्रत्येक भारतीयाचे जीवन आनंदी आणि निरोगी रहावे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे सूत्र घेऊन प्रत्येक भारतीयाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

S.Tupe/N.Chitale/D.Rane