Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट


श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी (आयओटी ) आज कोलंबो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग  देईल अशी घोषणा  मोदी यांनी केली.

एक्स वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:

भारतीय वंशाच्या तमिळ (आयओटी) नेत्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. हा समुदाय 200 वर्षांहून अधिक काळ दोन्ही देशांमधील एक जिवंत सेतू आहे. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला  भारत सहयोग  देईल.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com