Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेतील जाफना येथे भारताच्या मदतीने बांधलेल्या प्रतिष्ठित  सांस्कृतिक केंद्राचे ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत


 

भारताच्या मदतीने श्रीलंकेतील जाफना येथे बांधलेल्या प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण करण्यात आल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वागत केले.

X वरील इंडिया इन श्रीलंका हँडलच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:

जाफना येथे भारताच्या साहाय्याने उभारलेल्या प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे  ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण केल्याचे  स्वागत आहे. महान थिरुवल्लुवर यांना आदरांजली  वाहण्याबरोबरच, भारत आणि श्रीलंकेतील लोकांमधील दृढ सांस्कृतिक, भाषिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांची यावरून साक्ष पटते.”

***

JPS/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com