श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रवि करुणानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज संवाद साधला.
आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त मागच्या महिन्यात श्रीलंका येथे दिलेल्या फलदायक आणि स्मरणीय भेटीला पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची नवी जबाबदारी स्वीकारणारे करुणानायके यांचे त्यांनी अभिनंदन केले.
श्रीलंकेत नुकतीच उद्भवलेली पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे झालेल्या जिवीतहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. यासंदर्भात भारत श्रीलंकेला मदत करण्यास कायम तत्पर राहिल, असा दिलासाही त्यांनी दिला.
श्रीलंकेतील पूरस्थिती आणि भूस्खलनानंतर भारताने तात्काळ केलेल्या मदतीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री रवि करुणानायके यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारतासोबतची भागिदारी दृढ करण्याप्रति श्रीलंका सरकारच्या वचनबध्दतेची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
B.Gokhale/M,Pange/Anagha
Mr. Ravi Karunanayake, the Foreign Minister of Sri Lanka met PM @narendramodi. pic.twitter.com/MVu3KB7Qsq
— PMO India (@PMOIndia) June 6, 2017