Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंका भेटी दरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना केलेले वक्तव्य


s2015031363041 [ PM India 188KB ]

s2015031363042 (1) [ PM India 220KB ]

s2015031363043 [ PM India 256KB ]

श्रीलंकेचे राष्ट्रपती आदरणीय मैत्रीपाल सिरीसेना,

माध्यमांचे प्रतिनिधी,

श्रीलंकेमधील कोलंबो या सुंदर शहरात येऊन मी आनंदित झालो आहे. आपल्या सर्वात जवळील शेजारील देश आणि ज्याच्या सोबत आपण इतक्या बाबींची देवाण-घेवाण करतो त्या देशाला भेट दयायला मी उत्सूक होतो.

तुमच्या स्वागताने आणि मैत्रीने मी खरेच खूप सन्मानित झालो आहे.

या दौऱ्याचे महत्त्व मी जाणतो.

1987 पासून भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गेल्या महिन्यात आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारतात येऊन आमचा सन्मान केला होता. इतक्या लवकर येथे येऊन मला आनंद होत आहे.

हेच शेजाऱ्यांमध्ये झाले पाहिजे. आपण नियमित भेटले पाहिजे.

एकमेकांना समजून घ्यायला, द्विपक्षीय समस्यांवर तोडगा काढायला यामुळे मदत होईल आणि आपले संबंध अजून पुढे जातील.

राष्ट्रपती सिरीसेना यांच्या सोबतच्या बैठकीत आज मी हेच साध्य केले आहे.

आर्थिक करार हा आपल्या संबंधांचा मुख्य स्तंभ आहे.

आपण जो विकास केला आहे आर्थिक सहकार्य दृढ करण्याच्या आपल्या वचनबध्दतेचे, प्रतिबिंब आहे.

गेल्या दशकात आपल्या व्यापारामध्ये लक्षणीय वाढ निदर्शनाला आली आहे. भारताबरोबर व्यापारा संदर्भात तुम्हाला असलेल्या चिंतांशी मी अवगत आहे. मी दिल्लीत याआधी बोललो होतो, आपण त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करुया.

आपल्या सीमाशुल्क प्राधिकरणांमध्ये आज झालेला सहकार्य करार हे त्याच दिशेने उचलेले एक पाऊल आहे. यामुळे व्यापारात सुलभता येईल आणि दोन्ही बाजूंचे अप्रशुल्क अडथळे ही कमी होतील.

आम्ही फक्त समस्या सोडविण्याच्या दिशेनेच काम करत नाही. आम्ही नवीन संधींवर देखील लक्ष केंद्रीत करत आहोत.

त्रिनकोमालीमध्ये चीनच्या उपसागरात संयुक्तपणे अप्पर टँक फार्म विकसित करण्यासाठी लंका आयओसी आणि सेलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे परस्पर सहमत अटींवर एकमत झाले आहे.

या संदर्भात काम करण्यासाठी लवकरच संयुक्त कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. त्रिनकोमालीला प्रादेशिक पेट्रोलियम हब म्हणून निर्माण करण्यासाठी भारत सदैव तयार आहे.

सामपूर कोळसा ऊर्जा प्रकल्पावर लवकरच काम सुरु होईल. या प्रकल्पामुळे श्रीलंकेच्या ऊर्जेची गरज पुर्ण होण्यास मदत होईल.

सागरी अर्थव्यवस्था ही एक नवीन सीमा आहे जिथे आपल्या दोघांसाठी प्रचंड वचने आहेत. आपल्या दोन्ही देशांसाठी हे प्राधान्य आहे. सागरी अर्थव्यवस्थेसाठी संयुक्त कृती दल स्थापन करण्याचा आपला निर्णय आपल्या संबंधांमुळे एक उल्लेखनीय पाऊल आहे.

लोक आपल्या संबंधांतील हृदयात आहेत. लोकांनी एकमेकांसोबत संबंध वाढविण्यासाठी आणि पर्यटन वृध्दिंगत करण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत.

सिन्हाल आणि तामीळी नवीन वर्ष 14 एप्रिल 2015 पासून श्रीलंकेच्या नागरिकांसाठी आम्ही “पर्यटक आगमन व्हिसा – इलेक्ट्रॉनिक पर्यटन प्राधिकरण” योजनेची सुविधा सुरु करणार आहोत.

एअर इंडिया लवकरच नवी दिल्ली आणि कोलंबो दरम्यान थेट विमान सेवा सुरु करणार आहे.

आम्ही श्रीलंकेत रामायणाच्या आणि भारतात महात्मा बुद्‌ध यांच्याशी संबंधित स्थळाचा विकास करण्यासाठी सहकार्य करु.

या वर्षाच्या अखेरीला आम्ही श्रीलंकेत भारत महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. श्रीलंका हा असा देश आहे जिथे बुध्द धर्म खऱ्या अर्थाने बहरला. या महोत्सवाचा एक भाग म्हणून आम्ही बुध्द धर्माच्या परंपरांचे प्रदर्शन देखील आयोजित करणार आहोत.

युवक व्यवहारासंदर्भातील सामंजस्य करार ही आपल्या संबंधांतील एक महत्त्वपूर्ण दिर्घकालीन गुंतवणूक आहे.

श्रीलंकेच्या विकासात त्याचा भागिदार बनण्यास भारताला गर्व वाटत आहे.

आम्ही रेल्वे क्षेत्रासाठी नवीन 318 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज देणार आहोत. याचा वापर नवीन रेल्वे रुळ बनविण्यासाठी आणि जुन्या रेल्वे रुळांच्या अद्ययावतीकरणासाठी केला जाईल.

मतारामध्ये रुहुना विद्यापीठात रविंद्रनाथ टागोर सभागृहाच्या उभारणीमध्ये मदत करताना आम्हाला आनंद होत आहे.

उद्या मी भारताने आर्थिक मदत केलेल्या गृह प्रकल्पासह इतर प्रकल्पांना भेट देणार आहे. मला आनंद आहे की 27 हजारांहून अधिक घरांचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे.

1.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या चलनाची देवाण-घेवाण करायला भारतीय रिझर्व बँक आणि श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने सहमती दर्शविली आहे. यामुळे श्रीलंकेला रुपया स्थिर ठेवण्यास मदत होईल.

आम्ही मच्छिमारांच्या मुद्दयावर चर्चा केली. या क्लिष्ट मुद्दयांमध्ये दोन्ही बाजूंमधील उदरनिर्वाह आणि मानवतावाद या चिंतेच्या बाबींचा समावेश आहे. आम्ही अनुषंगाने हा मुद्दा हाताळू त्याचवेळी या मुद्दयासाठी दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची गरज आहे.

द्विपक्षीय सहमत करार बनविण्यासाठी भारताच्या आणि श्रीलंकेच्या मच्छिमार संघटनांची लवकरात लवकर बैठक होणे हे देखील महत्त्वूपर्ण आहे. त्यानंतर दोन्ही देशांची सरकारे यावर विचार करतील.

श्रीलंकेच्या सर्वसमावेशक भविष्यासाठी राष्ट्रपती सिरिसेना करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करण्याची संधी देखील आम्हाला यामुळे प्राप्त झाली आहे.

श्रीलंकेच्या शांती, सामंजस्य आणि विकासाच्या नवीन प्रवासात आम्ही आमचा पाठिंबा आणि शुभेच्छा देतो.

श्रीलंकन तामिळ समाजासह सर्व समाजातील घटकांना समानता, न्याय, शांती आणि प्रतिष्ठित जीवन प्रदान करण्यासाठी भविष्यातील प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे.

आम्हाला आशा आहे की 13 व्या सुधारणांची लवकर व पूर्ण अंमलबजावणी केली जाईल आणि यापुढे जाऊन विकासात याचे योगदान मिळेल.

आपल्या समुद्री शेजारासह आपल्या दोन्ही देशांमध्ये शांतता व भरभराटीच्या भागीदारीला बळकट करण्यासाठी भारत वचनबध्द असल्याचे मी येथे सांगतो.

मी पुन्हा एकदा माझ्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल राष्ट्रपती सिरीसेना यांचे आभार मानतो.

आजची बैठक ही खूप फलदायी ठरली. या बैठकीने आपल्या भविष्यातील संबंधांबाबत दृढ विश्वास आणि आशावाद दिला आहे. धन्यवाद.

— PMO India (@PMOIndia) March 13, 2015