Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधानांकडून अभिवादन


शिवजयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवजयंतीनिमित्त अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अवर्णनीय आहे. त्यांचा लढाऊ बाणा आणि दुर्दम्य शौर्य अतुलनीय आहे.

उत्तम प्रशासन आणि परिपूर्ण प्रशासक म्हणून मार्गदर्शक असणारे शिवाजी महाराज सदैव स्मरणात राहतील.

आपल्या सर्वांसाठी ते सदैव स्फूर्तीदायी राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N. Chitale / I. Jhala / M. Desai