Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शिक्षक समुदायाला शुभेच्छा


शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

‘शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी ‍शिक्षक समुदायाला शुभेच्छा. युवा मनांना आकार देण्यात आणि देश उभारणीच्या कामी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात.

असामान्य शिक्षक असणारे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली, ’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Pange/P.Kor