शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी अनौपचारिक संवाद साधला.
देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी अविरत कार्य करत रहावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शिकवतांना या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांतील कल्पकतेला शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षकांनी स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी तसंच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. राम शंकर कथारीया यावेळी उपस्थित होते.
J. Patankar/S.Tupe
Met teachers who have been conferred National Awards. Our interaction was wonderful. http://t.co/wpuZbK7wjz
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2015
I congratulated all teachers conferred the National Awards for their determination & their invaluable service to our nation.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2015