पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्षकेतर आणि केंद्रीय आरोग्य सेवेच्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांचे निवृत्तीचे वय 62 वर्षांवरुन 65 वर्षांपर्यंत, तर जनरल ड्युटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सब-केडरच्या डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवायला मंजुरी दिली.
या निर्णयामुळे रुग्णांची उत्तम सेवा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये योग्य शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यास मदत मिळेल.
कोणतेही आर्थिक निर्बंध नसतील, रुग्णांच्या अविरत सेवेसाठी रिक्त जागा त्वरित भरल्या जातील.
S. Kane / B. Gokhale