जागतिक बँकेचे अध्यक्ष डॉ. जीम याँग किम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान, डॉ. जीम याँग किम म्हणाले की, भारताने उद्दिष्टात ध्येयांकडे केलेल्या वाटचालीकडे बघता मी प्रभावित झालो असून त्यांनी वर्ल्ड बँकेकडून भारताला हवामान बदलासाठीच्या निधीसाठी नियंत्रित पाठिंबा देण्यात येईल असे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी जागतिक बँकेतर्फे भारताला स्मार्ट शहरे, गंगा शुद्धीकरण, कौशल्य विकास, स्वच्छ भारत आणि सर्वांसाठी ऊर्जा या क्षेत्रांसाठी मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी आणि डॉ. किम यांनी दिर्घकालीन आणि सर्वोतोपरी सहकार्याबाबत चर्चा केली.
B.Gokhale
Met @WorldBank President @JimYongKim & discussed ways to deepen India’s engagement with the World Bank. https://t.co/5yfW1e8BZK
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2016