Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शाश्वत नागरी विकासाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि मालदीव यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय  मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला गृहनिर्माण व शहरी कामकाज  मंत्रालय, आणि मालदीवच्या राष्ट्रीय नियोजन, गृहनिर्माण व पायाभूत सुविधा मंत्रालय दरम्यान  शाश्वत नागरी   विकास क्षेत्रात सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. फेब्रुवारी 2021 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

सामंजस्य कराराच्या चौकटी अंतर्गत सहकार्यासंबंधी कार्यक्रमांची रणनीती आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल. या संयुक्त कृती गटाची वर्षातून एकदा मालदीव आणि भारतात.बैठक होईल.

 

लाभ :

या सामंजस्य करारामुळे उभय देशांमधील शाश्वत नागरी   विकासाच्या क्षेत्रात दृढ, सखोल व दीर्घकालीन द्विपक्षीय सहकार्याला  प्रोत्साहन मिळेल.  शहर नियोजन, स्मार्ट शहरे विकास, घनकचरा व्यवस्थापन, परवडणारी घरे, शहरी हरित गतिशीलता, नागरी वेगवान वाहतूक , स्मार्ट शहरे विकास  यासह शाश्वत नगर  विकासाच्या क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल, अशी शक्यता आहे.

 

तपशीलः

करार करणार्‍या दोन्ही पक्षांनी  स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून म्हणजेच 20 फेब्रुवारी 2021 पासून सामंजस्य करार अंमलात आला आहे आणि तो अनिश्चित काळासाठी लागू राहील.

शहर नियोजन, स्मार्ट शहरे विकास, घनकचरा व्यवस्थापन, परवडणारी घरे, शहरी हरित गतिशीलता, शहरी वाहतूक स्मार्ट शहरे विकास  यासह शाश्वत शहर विकासाच्या क्षेत्रात भारत-मालदीवमधील तांत्रिक सहकार्य सुलभ आणि बळकट करणे ही  या सामंजस्य कराराची उद्दीष्टे आहेत.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com