Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत (24 जून 2016) पंतप्रधानांचे भाषण

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत (24 जून 2016) पंतप्रधानांचे भाषण

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत (24 जून 2016) पंतप्रधानांचे भाषण


माननीय इस्माईल कारीमोव,

उझबेकिस्तान प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती,

शांघय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांचे नेते,

आमंत्रित नेते,

मान्यवर स्त्री आणि पुरुष

जवळपास वर्षभरापूर्वी मी माझा मध्य आशियातल्या देशांचा प्रवास ताश्कंदपासून सुरु केला होता.

आदरणीय कारीमोव आणि उझबेक जनतेने केलेले प्रेमळ आणि उदार स्वागत अजूनही माझ्या लक्षात आहे.

माननीय कारीमोव या बैठकीसाठी तुम्ही केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल आणि अतिथ्याबद्दल इतरांबरोबर मीही तुमचे आभार मानतो.

गेल्यावर्षी ऊफा परिषद, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी उत्तमपणे आयोजित केली, शांघाय सहकार्य संघटनेच्या नेत्यांनी भारताला पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारले.

भारत शांघाय सहकार्य संघटनेबरोबर जोडण्‍यातला तो महत्त्वाचा टप्पा होता.

दिवसाच्या उत्तरार्धात आपण बांधिलकी करारावर स्वाक्षऱ्या करु.

याबरोबरच शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या सदस्यत्वाची प्रक्रिया अधिकृत होईल.

याबरोबरच जगातल्या लोकसंख्येच्या एक षष्ठांश मानव शांघाय सहकार्य संघटनेत सहभागी होतील. भारताचे या क्षेत्राशी जुने संबंध आहेत.

शांघाय सहकार्य संघटनेसाठी भारताच्या सदस्यत्वाला भरभरुन पाठिंबा दिल्याबद्दल शांघाय सहकार्य संघटनेतल्या सदस्य देशांचे आणि त्यांच्या नेत्यांचे आम्ही आभारी आहोत.

शांघाय सहकार्य संघटनेचा नवा सदस्य म्हणून पाकिस्तानचे आणि प्रथमच या संघटनेचा निरीक्षक होणाऱ्या बेलारुसचे स्वागत करतो.

महामहिम,

भारत या क्षेत्रात नवा नाही. तुमचे आणि आमचे ऐतिहासिक संबंध शतकांपूर्वीचे आहेत आणि केवळ भूगोलच आपल्याला जोडतो असे नाही. आपला समाज, संस्कृती, आहार आणि वाणिज्य अशा धाग्यांनी समृध्द झालेले आहेत.
महामहिम

आधुनिक काळात रशिया, चीन आणि मध्य आशियातल्या देशांबरोबरच्या संबंधांसाठी सेतू ठरलेले आहेत.

भारताच्या पूर्ण सदस्यत्वाबरोबरच शांघाय सहकार्य संघटनेच्या सीमा पॅसिफिकपासून युरोपपर्यंत आणि आर्क्टिकपासून हिंदी महासागरापर्यंत विस्तारल्या आहेत.

आम्ही 40 टक्के मानववंशाचे आणि एक अब्जाहून अधिक युवांचे प्रतिनिधित्व करत आहोत.

शांघाय सहकार्य संघटनेच्या त्त्त्वज्ञानाशी जुळणारी तत्वे भारत या गटात घेऊन येत आहे.

युरोशिअन जनतेशी भारताचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत.

आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात स्थिरता, सुरक्षा आणि समृध्दी ही आपली समान जागतिक ध्येय आहेत.
ऊर्जा, नैसर्गिक स्रोत आणि उद्योगात शांघाय सहकार्य संघटनेच्या ताकदीचा भारताला फायदा होईल, यात काही शंकाच नाही.

यासोबतच भारताची बळकट अर्थव्यवस्था आणि तिची बाजारपेठ शांघाय सहकार्य संघटना क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती देईल.

व्यापार, गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, अंतराळ, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य निगा, लघू आणि मध्यम उद्योग यातील भारताच्या क्षमता शांघाय सहकार्य संघटनेतल्या देशांमध्ये आर्थिक फायदा विस्तारु शकतात.
या क्षेत्रात मनुष्यबळ आणि संस्थात्मक क्षमता विकसित करण्यासाठी आपण भागिदार होऊ शकतो.

आपला प्राधान्यक्रम जुळत असल्याने आमचे विकासाचे अनुभव तुमच्या राष्ट्रीय गरजांशी सुसंगत ठरु शकतात.

महामहिम,

एकमेकांवर अवलंबून असलेले आजचे 21वे शतक भरपूर आर्थिक संधी असलेले आहे.

भू-राजकीय गुंतागुंत आणि सुरक्षा आव्हानांनाही आजचे जग सामोरे जात आहे.

आर्थिक समृध्दीसाठी राष्ट्रे एकमेकांशी जोडलेली असणे आवश्यक आहे.

हे केवळ भौतिक जोडणीपुरता हा संबंध नाही.

आपल्याला आवश्यक आहे तो वस्तू, सेवा, भांडवल आणि आपल्या जनतेचा एकसंध ओघाची. पण तेही केवळ पुरेसे नाही.

आपले क्षेत्र इतर जगाशी मजबूत रेल्वे, रस्ते आणि हवाई जाळयांनी जोडले जाणे गरजेचे आहे.

शांघाय सहकार्य संघटनेत व्यापार, वाहतूक, ऊर्जा, डिजिटल या क्षेत्रात नागरिकांमधील संवादासाठी भारत उत्तम भागीदार म्हणून काम करु शकतो.

आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग, चाबाहार करार आणि अश्गाबात करार यात सहभागी होण्याचा आमचा निर्णय ही इच्छा आणि हेतू प्रतिबिंबित करतो.

महामहिम,

शांघाय सहकार्य संघटनेतील भारताचे सदस्यत्व या क्षेत्राच्या भरभराटीत भर घालेल. या क्षेत्राची सुरक्षाही बळकट करेल. आपली भागीदारी आपल्या समाजाचे द्वेषाच्या जहाल विचारसरणींच्या, हिंसा आणि दहशतीच्या धोक्यापासून संरक्षण करेल.

या उद्दिष्टांसाठी काम करण्याकरिता भारत शांघाय सहकार्य संघटनेतील देशांमध्ये एकी साधेल. सर्व स्तरावर दहशतवादाशी सामना करण्याकरिता सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचा दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे.

दृष्टिकोनातील समान ध्येयामुळे स्थिर, स्वतंत्र आणि शांतिमय अफगाणिस्तान ही प्रत्येक अफगाणाची फक्त इच्छा नाही. हे शांघाय सहकार्य संघटनेच्या क्षेत्राच्या व्यापक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

माननीय महोदय समारोप करताना मी असे म्हणेन की,

शांघाय सहकार्य संघटनेच्या सर्व सहकार्याबरोबर भारताचे संबंध या क्षेत्राच्या बांधणीसाठी, जे जगाच्या आर्थिक विकासाचे इंजिन आहे, अंतर्गतदृष्टया जे अधिक स्थिर आणि सुरक्षित आहे आणि इतर भौगोलिक क्षेत्राशी मजबुतरित्या जोडलेले आहे, त्यासाठी साहाय्यभूत ठरेल, असा मला विश्वास आहे.

महामहिम,

पुढल्यावर्षी समान भागीदार म्हणून ॲस्टाना येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत आपण सहभागी होऊ.

शांघाय सहकार्य संघटनेच्या 2017 मध्ये होणाऱ्या बैठकीच्या आयोजनासाठी मी कझाकिस्तानला शुभेच्छा देतो.

उझबेकिस्तानच्या जनतेचे आणि सरकारचे त्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो आणि आजच्या बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल महामहिम कारीमोव यांचे अभिनंदन करतो.

S.Kulkarni/B.Gokhale