पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सिंगापूर यांच्यात शहर नियोजन आणि प्रशासन या क्षेत्रात सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य कराराला आज कार्योत्तर मंजुरी दिली. 24 नोव्हेंबर 2015 रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला होता.
या करारामुळे दोन्ही देशांना शहर विकास, प्रशासन आणि क्षमता निर्मितीमधील अनुभवांचे आदानप्रदान करता येईल.
S.Kane/S,Tupe/M.Desai