व्यवसाय मध्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहसचिव आणि अतिरिक्त सहसचिव पदाच्या 100 आयएएस अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी विकासकामे, कृषी, सिंचन आणि अन्न प्रक्रिया, चलनफुगवटा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी आणि सामाजिक कल्याण, स्त्री भ्रूणहत्या, कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रातले आपले अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या सूचना आणि विचार यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. सततची नाविन्यपूर्णता प्रशासकीय क्षमता व कार्यपध्दतीत गुणसंवर्धन यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रशासनात पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर याचे महत्त्व त्यांनी सांगितले. “प्रगती” (Pro Active Govereanance & Timely Implimentation) व्यासपीठाद्वारे विभिनन मंत्रालये व राज्य सरकारांशी पंतप्रधान साधत असलेल्या संवादाविषयीही त्यांनी माहिती दिली. परस्परांवरील विश्वास आणि सांघिक भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह, कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा आणि पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव पी.के. मिश्रा यावेळी उपस्थित होते.
S.Kulkarni/N.Sapre
Was great hearing experiences of IAS officers in various fields, participating in mid-career training programme. http://t.co/Yrkc4OI75Z
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2015