वैकल्पिक औषध क्षेत्रातल्या भारत आणि जर्मनी यांच्यातल्या सहकार्याबाबतच्या आशयाच्या संयुक्त घोषणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे पारंपरिक आणि वैकल्पिक औषध क्षेत्रात उभय देशात सहकार्य आणखी मजबूत होणार आहे. वैकल्पिक औषध क्षेत्रात वैज्ञानिक क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षण, एकत्रित संशोधनामुळे आयुष क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. संशोधन, प्रशिक्षण यासाठी लागणार निधी, आयुष मंत्रालयासाठी निर्धारित निधी आणि सध्याच्या योजनातुन वापरण्यात येईल. यासाठी कोणतीही अतिरिक्त तरतूद करावी लागणार नाही.
N.Sapre/N.Chitale/D.Rane