Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. थेट परकीय गुंतवणुकीबाबतच्या प्रस्तावांवर संबंधित मंत्रालयानी, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि वाणिज्य मंत्रालयाशी सल्लामसलत करून त्यासंदर्भात कार्यवाही करायची आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना भारत हे गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक ठिकाण वाटेल आणि थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढेल. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे भारतात व्यवसाय करणे अधिक सुलभ होणार आहे. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 24 मे 2017 ला झालेल्या बैठकीतच मंजूरी मिळाली होती.

N.Sapre/N.Chitale/D.Rane