युरोपियन संघराज्याशी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक करण्यात आलेल्या सामंजस्य आणि सहकार्याच्या कराराला पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. कराराला पाच वर्षांची मुदत वाढ मिळाल्यामुळे आता मे 2020 पर्यंत युरोपियन संघराज्याच्या सहकार्याने देशात सामाजिक आणि आर्थिक विकास कार्यक्रम राबविणे शक्य होणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन विकास करण्यासाठी आणि उभय देशांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यासाठी या कराराची मदत होणार आहे.
S. Bedekar / B. Gokhale