Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विकसित भारत संकल्प यात्रेतील सहभागी लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 9 डिसेंबर ला साधणार संवाद


नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नऊ डिसेंबरला, दुपारी साडे बारा वाजता, विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.

देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी आभासी माध्यमातून सहभागी होणार आहेत. देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे आणि सामाईक सेवा केंद्रे, इथून 2 हजारापेक्षा अधिक विकसित भारत संकल्प यात्रेच्या गाड्या  या कार्यक्रमात सहभागी होतील. मोठ्या संख्येने केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

या योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची खात्री करून सरकारच्या पथदर्शी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरू करण्यात  आली आहे.

 S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai