Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या शिकवणीचे पंतप्रधानांकडून स्मरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किगली कराराचे स्वागत केले आहे. हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या हायड्रोपलोरोकार्बनच्या (एचएफसी) वापराला आळा घालणाऱ्या या करारावर भारतासह 197 राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मॉन्ट्रीयल मसुद्याची आज सकाळी किगली करारात झालेली परिणती ही ऐतिहासिक घटना असून त्याचा आपल्या ग्रहावर दूरगामी परिणाम होणार आहे.

या करारामुळे या शतकाच्या अखेरीपर्यंत जागतिक तापमानात 0.5 डिग्री घट होणार असून यामुळे पॅरिसमध्ये ठेवण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होणार आहे.
भारत तसेच इतर राष्ट्रांनी दिलेले सहकार्य आणि दाखवलेल्या लवचिकतेमुळे हा महत्त्वाकांक्षी, न्याय्य, एचएफसी करार साकार झाला आहे.

या करारामुळे भारतासारख्या देशांना, कमी कार्बन उत्सर्जन करणारे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

हरित वसुंधरेसाठी योगदान देणाऱ्या या महत्त्वाच्या मुद्दयांवर एकत्र आल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व देशांचे अभिनंदन केले आहे.

B.Gokhale/N.Chitale/Anagha