Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी येथे जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीतील प्रतिनिधींच्या सन्मानार्थ सादर केलेल्या ‘सूर वसुधा’चे पंतप्रधानांनी केले कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे झालेल्या जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीतील प्रतिनिधींच्या सन्मानार्थ सादर केलेल्या सूर वसुधाया नादमधुर सुरावटीचे कौतुक केले आहे.

वाद्यवृंदामध्ये 29 जी 20 सदस्य आणि आमंत्रित देशांतील संगीतकारांचा समावेश होता. वाद्यांची वैविध्यता आणि मातृभाषेतून गाणारे गायक याद्वारे संगीत परंपरा साजरी झाली. वाद्यवृंदाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरावटीतून “वसुधैव कुटुंबकम” अर्थात जग हे एक कुटुंब आहे ही भावना प्रतीत झाली.

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या  वरच्या   पोस्टला  उत्तर देताना, पंतप्रधानांनी म्हटले;

वसुधैव कुटुंबकमचा संदेश बिंबवण्याचा एक उत्तम मार्ग आणि तोही काशी शहरातून!

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai