Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले.

वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले.


वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालविया यांना आदरांजली अर्पण केली. मालविय यांचा द्रष्टे व्यक्तिमत्व असा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की मालविया यांनी राष्ट्रउभारणीसाठी ज्ञानी आणि समर्पित माणसे घडविली. पदवी प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असू नये तर प्रत्येकाने स्वत:मधील विद्यार्थी जागृत ठेवला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीलाही समतोल वृत्तीने सामोरे जावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सिकलसेल अनेमिया, जागतिक तापमानवाढ आणि सौरऊर्जा अशा उदाहरणांचा दाखला देत देशाला तसेच संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी युवकांनी नावीन्यतेचा शोध घेतला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. या समारंभाला उपस्थित असलेल्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष अतिथी म्हणून संबोधित केले. पदक विजेत्यांनी या मुलांशी संवाद साधावा, जेणेकरुन या शालेय विद्यार्थ्यांनाही स्फूर्ती मिळेल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

N. Chitale / S. Tupe / M. Desai