Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वरिष्ठ पेन्शन बीमा योजना 201


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वरिष्ठ पेन्शन बीमा योजना 2017 सुरु करण्याला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. आर्थिक सर्वसमावेशकता आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकारच्या कटिबध्दतेचा हा एक भाग आहे.

चालू आर्थिक वर्षात, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. या योजनेअंतर्गंत, वृध्दापकाळात सामाजिक सुरक्षा पुरवली जाईल आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे व्याजाचे उत्पन्न घटल्यावर संरक्षण पुरवले जाईल. या योजनेअंतर्गत, दहा वर्षांसाठी 8 टक्के वार्षिक दराने नियमितपणे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडता येईल.

ही योजना सुरु झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणीसाठी खुली असेल.

B.Gokhale/S.Kane/Anagha