लेहमधे आयुष मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था उभारायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बांधकामापासून ते प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत देखरेख करण्यासाठी श्रेणी 14 मधे संचालक पदाची निर्मिती करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
लडाखच्या स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन तसेच सोवा रिगपा औषध प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने लेह इथे राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 47.25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारतातल्या हिमालयीन पट्ट्यातली सोवा रिगपा ही पारंपरिक औषध पद्धती आहे. सोवा रिगपा संस्थेच्या उभारणीमुळे भारतीय उपखंडात या प्रणालीच्या पुनरुज्जीवनासाठी मदत होणार आहे.
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane