Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय संस्था मसुरी आणि नामिबियातल्या लोक प्रशासन आणि व्यवस्थापन संस्था यांच्यात क्षमता वृद्धीसाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजूरी


लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय संस्था(एलबीएसएनएए) मसुरी आणि नामिबियातल्या लोक प्रशासन आणि व्यवस्थापन संस्था(एनआयपीएएम) यांच्यात नामिबियाच्या सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या आणि इतर प्रशिक्षण कार्यक्रमासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. नामिबियातल्या एनआयपीएएम या संस्थेला, उच्च नागरी सेवा विषयक प्रशिक्षण संस्था चालवण्याबाबतच्या अनुभव प्रदानासाठी या सामंजस्य करारामुळे मदत होणार आहे. सार्वजनिक प्रशासन आणि क्षमता वृद्धी क्षेत्रात संयुक्त उपक्रम हाती घ्यायलाही हा करार उपयुक्त ठरणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha