Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाओस येथील 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

महोदय,

महामहिम,

आपल्याबरोबरच्या आजच्या सकारात्मक चर्चेसाठी, तसेच आपला मोलाचा दृष्टीकोन आणि सूचनांसाठी मी आपले आभार मानतो.

आजच्या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी पंतप्रधान सोनसाय सिफानडोन यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.

डिजिटल परिवर्तन आणि आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी आपण  दोन संयुक्त निवेदने स्वीकारली आहेत ती भविष्यातील आपल्या सहकार्याचा पाया बळकट करतील. या यशाबद्दल मी सर्वांचे अभिनंदन  करतो.

गेली तीन वर्षे, आसियानमध्ये भारताचा देश समन्वयक म्हणून, सिंगापूरने सकारात्मक भूमिका बजावली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, आपल्या सहयोगामुळे  भारत-आसियान संबंधांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाली  आहे. आमचा नवीन देश समन्वयक म्हणून, मी फिलीपिन्सचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो.

दोन अब्ज लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आपण एकमेकांशी सहयोग करत राहू, असा मला विश्वास आहे.

लाओसच्या पंतप्रधानांनी आसियानचे अध्यक्षपद भूषविले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.  

मलेशियाने पुढील अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याबदल मी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने माझ्या शुभेच्छा देतो.

तुमच्या अध्यक्षपदाला भारताचा पूर्ण  पाठींबा राहील, असे मी आश्वासन देतो.

धन्यवाद!

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai