पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील ‘न्यूट्री गार्डन प्रकल्पाचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले की लक्षद्वीपमधील लोक नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्याचा अंगीकार करण्यासाठी किती उत्साही आहेत, हे, या उपक्रमामुळे दिसून येते.
स्वावलंबी भारताच्या विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा एक भाग म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यात 1000 शेतकऱ्यांना भाजीपाल्याची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
त्याशिवाय, घरगुती कुक्कुटपालन योजनेअंतर्गत लक्षद्वीप मधील 600 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना देशी जातीच्या 7000 कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.
लक्षद्वीपच्या राज्यपालांच्या ट्विटच्या मालिकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:
“प्रशंसनीय प्रयत्न, उत्कृष्ट परिणाम! नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अंगिकारण्यासाठी लक्षद्वीपमधील लोक किती उत्साही आहेत, हे या उपक्रमातून दिसून येते.”
सराहनीय प्रयास, बेहतरीन परिणाम! इस पहल ने दिखाया है कि लक्षद्वीप के लोग नई चीजें सीखने और अपनाने को लेकर कितने उत्साहित रहते हैं। https://t.co/5UFl57RtjK
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2023
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
सराहनीय प्रयास, बेहतरीन परिणाम! इस पहल ने दिखाया है कि लक्षद्वीप के लोग नई चीजें सीखने और अपनाने को लेकर कितने उत्साहित रहते हैं। https://t.co/5UFl57RtjK
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2023