पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनसला मान्यता देण्यात आली.
उत्पादकता आधारित बोनसची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
कुठल्याही वर्षातल्या उत्पादनाची गणना समान शुध्द टन किलोमीटरच्या माध्यमातून केली जाते. यासाठी पुढील गोष्टी विचारात घेतल्या जातात.
1. एकूण माल महसूल शुध्द टन किलोमीटरमध्ये
2. गैर उपनगरीय प्रवासी किलोमीटर
3. उपनगरीय प्रवासी किलोमीटर
इनपुटचा अर्थ अराजपत्रित कर्मचाऱ्यांशी (आरपीएफ आणि आरपीएसएफ कर्मचारी वगळून) आहे. यात कुठल्याही वर्षी (गेल्या तीन वर्षातल्या सरासरीपेक्षा अधिक) राशीमध्ये वृध्दींगत वाढ/घसरणीच्या आधारावर नफा ठरवला जातो.
78 दिवसांच्या मोबदल्याएवढा उत्पादकतेवर आधारित सर्वोच्च बोनस 2010-11, 2011-12, 2012-13 आणि 2013-14 या आर्थिक वर्षात देण्यात आला. यावर्षीही चांगली वित्तीय कामगिरी लक्षात घेऊन 78 दिवसांच्या मोबदल्याएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस देण्यात येईल. यामुळे उत्पादकता अधिक वाढवण्यासाठी काम करण्याचे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना मिळेल.
उत्पादकतेवर आधारित 78 दिवसांची रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी 1030.02 कोटी रुपयांची वित्तीय तरतूद अपेक्षित आहे. उत्पादकतेवर आधारित बोनस मिळण्यायोग्य मानल्या गेलेल्या अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्याला पारिश्रमिक गणना सीमा प्रति महिना 3,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी कमाल रक्कम 8,975 रुपये अपेक्षित आहे.
या निर्णयाचा 12 लाख 58 हजार अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होण्याचा अंदाज आहे.
उत्पादकतेवर आधारित बोनसअंतर्गत देशभरातले अराजपत्रित रेल्वे कर्मचारी (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) येतात.
पूर्वपिठीका :-
केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2015 मध्ये घेतलेल्या बैठकीत 78 दिवसांच्या मोबदल्याएवढा उत्पादकतेवर आधारित सर्वोच्च बोनस, सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) वित्तीय वर्ष 2014-15 मध्ये द्यायच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
S.Kulkarni/S.Tupe
The Union Cabinet chaired by the Prime Minister ShriNarendraModi, has approved the Production Linked Bonus for Railway Employees.
— PMO India (@PMOIndia) October 7, 2015