Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रूपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचे भूतान येथे आभासी स्वरुपात उद्घाटन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन


 

भूतानमध्ये रूपे कार्डच्या दुसऱ्या टप्याचे उद्घाटन उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर 2020 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान योंगचेन डॉ लोटे त्शेरिंग यांच्या हस्ते, संयुक्तपणे आभासी स्वरूपात होणार आहे.

भूतानचे पंतप्रधान ऑगस्ट 2019 मध्ये भारत दौऱ्यावर आले असतांना, भारत आणि भूतानच्या पंतप्रधानांनी रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील संयुक्तपणे केले होते. भूतानमध्ये रूपे कार्ड लागू झाल्यामुळे भारतातून जाणाऱ्या पर्यटक आणि इतर प्रवाशांना संपूर्ण भूतानमध्ये एटीम आणि पॉस मशीन्स वापरणे शक्य झाले आहे. या कार्डच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी झाल्यानंतर भूतानी नागरिक देखील, भारतात कुठेही रूपे कार्ड वापरू शकतील. 

भारत आणि भूतान दरम्यान परस्पर विश्वास आणि आदर यांच्यावर आधारलेले विशेष भागीदारीचे संबध आहेत. दोन्ही देशातील समान सांस्कृतिक वारसा आणि जनतेचे एकमेकांशी असलेले बंध, यामुळे हे परस्परसबंध अधिकच दृढ झाले आहेत. 

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com