Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिचर्डसन ॲन्ड क्रूडास (1972) मर्या. संदर्भातील सरकारी कर्ज समभाग आणि व्याज सवलतीत रुपांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मे.रिचर्डसन ॲन्ड क्रूडास (1972) मर्या. या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला औद्यागिक आणि आर्थिक पुनर्रचना मंडळातून बाहेर पडता यावे, यासाठी अवजड उद्योग विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासाठी कंपनीला दिलेले 101.78 कोटी रुपयांचे सरकारी कर्ज आणि त्यावरील 424.81 कोटी रुपये व्याजासह समभागामध्ये रुपांतरित करायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

तसेच कंपनीचे नागपूर आणि चेन्नई येथील कारखान्यांची धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि मुंबईतील कारभार कंपनीच्या अन्य ठिकाणी स्थलांतरीत करायलाही मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली. कंपनीची मुंबईतील भाडेतत्त्वावरील जागा ‘ऑक्युपेशन क्लास 2’ मध्ये रुपांतरित केली जाईल, जेणेकरुन या जागेचा सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार जास्तीत जास्त उपयोग करता येईल.

B.Gokhale/S.Kane/D. Rane