Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्‍यानचंद यांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण;


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्‍यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी यावेळी विविध क्रीडा पुरस्‍काराने सन्‍मानित खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदनही केले. “राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्‍त सर्व क्रीडा प्रेमींना शुभेच्‍छा देतानाचा मेजर ध्‍यानचंद यांना आदरांजली अर्पण करतो. देशात क्रीडापटूची प्रगती होवो, अशी इच्‍छा मी व्‍यक्‍त करतो. विविध क्रीडा पुरस्‍काराने सन्‍मानित होणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन. क्रीडा विश्‍वातील त्‍यांच्‍या प्रयत्‍न व योगदान यांचा आम्‍हांला अभिमान वाटतो”. असे पंतप्रधान म्‍हणाले.

*****

D.Wankhade/N.Sapre