Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय हवामानशास्त्र परिषदेच्या येत्या 4 जानेवारीला होणाऱ्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


नवी दिल्ली, 2 जानेवारी 2021

 

येत्या चार जानेवारीला राष्ट्रीय हवामानशास्त्र विभागाची परिषद होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करतील तसेच यावेळी त्यांचे विचारही मांडतील. तसेच ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’ आणि ‘भारतीय निर्देशक द्राव्य’ यांचेही पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होईल. ‘राष्ट्रीय पर्यावरण प्रमाणन प्रयोगशाळेचे’च्या इमारतीची पायाभरणी देखील पंतप्रधान करतील. केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

राष्ट्रीय आण्विक कालदर्शिकेमुळे, भारतीय प्रमाणवेळ 2.8 नॅनो सेकंदच्या अचूकतेनुसार दर्शवली जाऊ शकेल. ‘भारतीय निर्देशक द्राव्य’ आंतरराष्ट्रीय प्रमाणित निकषांनुसार गुणवत्तेची हमी देणारी प्रयोगशाळा उभारण्यासाठी, चाचणी आणि अंशाकनासाठी सहाय्यभूत ठरेल.  राष्ट्रीय पर्यावरण प्रमाणन प्रयोगशाळा हवेत तसेच उद्योगातून होणाऱ्या उत्सर्जनाच्या पातळीवर देखरेख ठेवून, त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वयंपूर्णता आणण्यास मदत करेल. 

 

परिषदेविषयी माहिती :

राष्ट्रीय हवामानशास्त्र परिषद 2021 चे आयोजन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL),नवी दिल्लीने केले आहे. या संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या परिषदेची संकल्पना, “देशाच्या एकात्मिक विकासासाठी हवामानशास्त्र’ अशी आहे.

* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com