Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय सागरी वाहतूक दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा, जलशक्तीवर भर देण्याची प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून- पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला राष्ट्रीय सागरी वाहतूक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारतातील सागरी जलवाहतूक क्षेत्राला मोठा इतिहास असून, देशात परिवर्तन घडवण्याची शक्ती त्यात आहे. आज राष्ट्रीय सागरी वाहतूक दिनानिमित्त, आपण देशाच्या समृद्धीसाठी सागरी शक्ती अधिक मजबूत करण्याचा संकल्प करुया.

आपल्या सागरी वाहतूक क्षेत्राला गतिमान आणि सक्षम बनवण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जलाशक्ती, जलवाहतूक, सिंचन, कालवे आणि बंदरे यांना सर्वोच्च प्राधान्य दिले होते. या क्षेत्रात त्यांनी केलेले काम भारतीयांसाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

***

NS/RA/PK