राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजना 2017-18 ते 2019-20 या काळासाठी सुरूच ठेवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी ईएफसीच्या शिफारसीनुसार 1160 कोटी रुपयांची तरतूद आहे.
वित्त मंत्रालय आणि नीती आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाच्या अंब्रेला योजनेअंतर्गत आठ योजना आणण्यात आल्या. या योजनेत सुयोग्य ताळमेळ राखून त्या अधिक प्रभावी ठराव्यात तसेच उपलब्ध संसाधनातून उत्तम परिणाम साधण्यासाठी मदत व्हावी हे यामागचे उद्दिष्ट आहे.
15-29 वयोगटातले युवक हे या योजनांचे लाभार्थी आहेत. विशिष्ट वयोगटासाठी निर्माण केलेला कार्यक्रम असेल त्यासाठी 10 ते 19 हा वयोगट आहे.
नेहरू युवा केंद्र संघटन, नॅशनल युथ कॉर्प्स, युवा आणि किशोर विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय सहकार्य, युथ हॉस्टेल, स्काऊट ॲण्ड गाईड संस्थांना सहाय्य, राष्ट्रीय शिस्तपालन योजना आणि राष्ट्रीय युवा नेते कार्यक्रम या आठ उपयोजनांचा राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत समावेश आहे.
***
B.Gokhale/N.Chitale /P.Kor