Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीड मंचाअंतर्गत येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक


नवी दिल्‍ली, 14 सप्‍टेंबर 2023 

 

प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घेणाऱ्या राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड मंचा अंतर्गत सर्वोच्च न्यायालय येणार असल्याचे सरन्यायाधीशांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणेचे कौतुक केले आहे. तंत्रज्ञानाच्या  या उपयोगाने आपल्या देशातील न्याय वितरण प्रणालीत अधिक सुधारणा होण्याबरोबरच ती  अधिक पारदर्शकही  होईल असे पंतप्रधान  म्हणाले.

एएनआयच्या एक्स वरील संदेशाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;

“सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे कौतुकास्पद पाऊल.  तंत्रज्ञानाच्या  या उपयोगाने  आपल्या देशातील न्याय वितरण प्रणालीत अधिक सुधारणा होण्याबरोबरच ती  अधिक पारदर्शकही  होईल.”

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai