पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (एनआरडीडब्ल्यूपी) चालू ठेवण्यासाठी आणि त्याची पुनर्रचना करण्यासाठी मंजुरी दिली आहे ,यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी योजनांच्या शाश्वततेवर (कार्यक्षमता) अधिक भर देऊन देऊन तो परिणाम-आधारित, स्पर्धात्मक बनेल आणि त्यावर अधिक चांगली देखरेख ठेवता येईल.
2017-18 ते 2019 -20 या चौदाव्या वित्त आयोगाच्या (एफएफसी) कार्यक्रमासाठी 23,050 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा कार्यक्रम देशभरातील सर्व ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहोचेल. पुनर्रचनेमुळे कार्यक्रम लवचिक, परिणामाभिमुख ,स्पर्धात्मक बनेल आणि शाश्वत पाइप पाणी पुरवठा वाढवण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मंत्रालयाला साहाय्य करेल.
या निर्णयाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :
मार्च 2021 पर्यंत आर्सेनिक / फ्लूरोईड प्रभावित वस्तीतील सर्व ग्रामीण लोकसंख्येला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी पुरवणे हे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्यांना कार्यक्रमांतर्गत घटकांची संख्या कमी करून एनआरडीडब्ल्यूपी निधीच्या वापरात अधिक लवचिकता दिली गेली आहे.
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) नुसार, भारतातील 77% ग्रामीण वसाहतींना पूर्णतः संरक्षित (एफसी) (दररोज 40 लिटर प्रति दिन) आणि ग्रामीण भागातील 56% जनतेला नळाद्वारे पाणी मिळत आहे ज्यामध्ये 16.7% कुटुंबाकडे नळ जोडणी आहे.
N.Sapre/S. Kane