Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय खनिज शोध-उत्खनन धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय खनिज शोध-उत्खनन धोरणाला मंजूरी दिली. या धोरणाअंतर्गत, खाजगी क्षेत्रांच्या मदतीने, देशभरातील खाण शोध आणि उत्खनन कार्याला गती दिली जाईल. देशात खनिजांचा नेमका किती साठा आहे आणि तो कुठे आहे याची निश्चित कल्पना येण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरेल. या खनिजांचा योग्य वापर करुन भारतीय अर्थव्यवस्थेतला त्यांचा वाटा वाढवणे, यामुळे शक्य होईल.

या धोरणाअंतर्गत, जागतिक दर्जाची भू वैज्ञानिक माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक केली जाईल. खाजगी-सरकारी भागीदारीतून उत्तम संशोधन केले जाईल. तसेच भूगर्भात खोलवर असलेल्या खनिजांचा शोध घेतला जाईल.

या धोरणाअंतर्गत, शोधलेल्या खाणींचा सरकार लिलाव करेल.

R.Aghor/B.Gokhale