नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला 2020-21 या आर्थिक वर्षातील ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या – एनएचएमच्या प्रगतीबद्दल माहिती देण्यात आली. जननी मृत्युदर (एम एम आर), अर्भक मृत्युदर (आय एम आर), पाच वर्षाखालील बालकांतील मृत्युदर (U5MR) आणि एकूण प्रजनन दर (टी एफ आर) यांमध्ये झपाट्याने घट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर क्षयरोग, मलेरिया, काळा आजार, डेंग्यू, कुष्ठरोग, विषाणूजन्य कावीळ अशा रोगांच्या निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रगतीबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
खर्च : 27,989.00 कोटी रूपये (केंद्राचा वाटा)
लाभार्थींची संख्या :
देशातील संपूर्ण लोकसंख्या लाभान्वित व्हावी, अशा प्रकारे ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानाची अंमलबजावणी केली जाते. या अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांना भेट देणार्या प्रत्येकाला आणि विशेषत: समाजातील असुरक्षित घटकांना आरोग्य सेवा प्रदान केली जाते.
मुद्देनिहाय तपशील :
कोविड – 19 साथरोगाला अटकाव करण्याबरोबरच रूग्णांचा शोध आणि या साथरोग व्यवस्थापनासाठी तातडीने प्रतिसाद देण्याच्या अनुषंगाने आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था सज्जता पॅकेजच्या – ईसीआरपीच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या भूमिकेची नोंद घेतली आहे. ईसीआरपी – I हा पूर्णपणे केंद्र समर्थित उपक्रम आहे आणि या पॅकेजअंतर्गत 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 8,147.28 कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत.
अंमलबजावणीचे धोरण आणि उद्दिष्ट्ये :
अंमलबजावणीचे धोरण :
या अभियानासंदर्भात, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंमलबजावणी धोरणानुसार, देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना, विशेषतः समाजातील गरीब आणि वंचित घटकांना, जिल्हा रुग्णालय पातळीपर्यंत सर्वांच्या आवाक्यातील, परवडण्याजोग्या, जबाबदार, आणि परिणामकारक अशा आरोग्यसेवा पुरवता याव्यात, यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक आणि तंत्रविषयक सहाय्य प्रदान करण्याची तरतूद आहे. आरोग्य संबंधी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, मनुष्यबळात वाढ तसेच ग्रामीण भागात सेवा देण्यात सुधारणा करून ग्रामीण आरोग्यसेवा क्षेत्रातील त्रुटी दूर करणे हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार प्रत्येकाला आरोग्य सुविधा प्रदान करण्याबरोबरच पायाभूत सेवांमध्ये सुधारणा आणि उपलब्ध स्रोतांचा प्रभावी वापर करण्यासाठी जिल्हा पातळीपर्यंत आरोग्य कार्यक्रम विकेंद्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 2025 सालापर्यंत गाठायची उद्दिष्ट्ये :
रोजगार निर्मितीची संभावना, यासह प्रमुख प्रभाव:
योजनेचा तपशील आणि प्रगती:
2020-21 दरम्यान एनएचएम अंतर्गत प्रगती खालील प्रमाणे:
* * *
S.Kane/Madhuri/Rajshree/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai