Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत झालेली प्रगती आणि सक्षम कार्यक्रम समितीच्या निर्णयांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत झालेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सक्षम कार्यक्रम समिती आणि सुकाणू गटाच्या निर्णयांबाबत अवगत करण्यात आले. एप्रिल 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आणि 2013 मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या शुभारंभासह त्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानात रुपांतर करण्यात आले.

माता मृत्यू दर, नवजात बालक मृत्यू दर, 5 वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर आणि टीएफआरमध्ये झालेली घट यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत झालेल्या प्रगतीची मंत्रिमंडळाने दखल घेतली. तसेच क्षयरोग, मलेरिया, कुष्ठरोग यांसारख्या विविध रोग नियंत्रक कार्यक्रमांच्या प्रगतीचीही यावेळी माहिती देण्यात आली.

N.Sapre/S.Kane/P.Kor