Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्राध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करून भारत  गौरवान्वित झाला  आहे: पंतप्रधान


 

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे  की भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.  इंडोनेशिया आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि भारत इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचे स्वागत करतो असे त्यांनी अधोरेखित केले. 

X वरील थ्रेड पोस्टमध्ये मोदी यांनी  लिहिले:

राष्ट्राध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करून भारत  गौरवान्वित झाला  आहे.

जेव्हा आपण आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हा इंडोनेशिया हे अतिथी राष्ट्र होते आणि आता जेव्हा आपण भारत प्रजासत्ताक झाल्याची 75 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा राष्ट्रपती सुबियांतो या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आम्ही भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

 @prabowo”

आम्ही सुरक्षा, संरक्षण उत्पादन, व्यापार, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अन्य क्षेत्रांमध्ये भारत-इंडोनेशिया संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. अन्न सुरक्षा, ऊर्जा आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारखी क्षेत्रे देखील आहेत ज्यात एकत्रितपणे  काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

भारत आणि इंडोनेशिया विविध बहुपक्षीय मंचावर एकमेकांना सहकार्य करत आहेत. इंडोनेशिया आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि आम्ही इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचे स्वागत करतो.”

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com