Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदी एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदी एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“राष्ट्रपतीपदी एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन. आपली बुद्धीमत्ता आणि मानवतावादी वृत्तीने राष्ट्रपती सर्व देशवासियांसाठी प्रिय झाले आहेत. महत्वाच्या धोरणात्मक मुद्यांबाबत त्यांना उत्तम जाण आहे. युवा, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमिकरणाबद्दलही त्यांना कळकळ आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar